Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पाटचारीत हातपाय धुवायला गेला अन्‌ जीव गमावला

पाटचारीत हातपाय धुवायला गेला अन्‌ जीव गमावला

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या (Yawal) तालुक्यातील साकळी येथील १४ वर्षीय बालकाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मृत्‍यू (Death) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. निखिल मुंकुंदा सोनवणे असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

पोलीसांकडून मिळालेल्‍या माहीतीनुसार यावल तालुक्यातील साकळी येथील आंबेडकर नगरातील रहीवासी निखिल मुंकुंदा सोनवणे (वय १४) हा दहावीला आहे. निखील हा साकळी शिवारातील पाटचारीजवळ २२ फेब्रुवारी बकऱ्या (Jalgaon News) चारण्यासाठी गेला होता. यावेळी गावातीलच राहणारा रणविर भिला सोनवणे हा देखील त्याच्यासोबत बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. हातपाय धुण्यासाठी पाटचारीजवळ गेला असता त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. त्‍याला बाहेर येता न आल्‍याने त्‍याचा बुडून मृत्‍यू झाला.

निखीलच्‍या सोबत असलेल्या रणविर सोनवणे याने तात्काळ गावाकडे धाव घेत घटनेची माहीती दिली. गावातील काही तरूणांनी पाटचारीकडे धाव घेतली. निखिल सोनवणे यास पाटचारीतुन बाहेर काढुन तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. या संदर्भात दिलेल्या माहितीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी निखिल सोनवणे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT