Mangesh Chavan Saam tv
महाराष्ट्र

Mangesh Chavan: भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक; सत्तर हजार केले लंपास

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक; सत्तर हजार केले लंपास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेले धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले. एवढेच नव्हे, तर फेसबुक (Cyber Crime) पेजला कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिटकार्डमधून ७० हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon MLA Mangesh Chavan News)

आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक केल्याबाबत, गोपाल शिवाजी म्हस्के (रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) यांनी याबाबत जळगाव सायबर पोलिसांत (Cyber Police) फिर्याद दिली. त्यानुसार २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंट “Mangesh Chavan” व “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे फेसबुक पेज हॅक केले. त्यानंतर प्रोफाइल छायाचित्र बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचे धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले.

ओटीपी न घेता ७० हजार लंपास

फेसबुक अकाउंटवरील पोस्टदेखील डिलीट केल्या. एवढेच नव्हे, तर Mangesh Chavan-मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिटकार्डमधून ओटीपी न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रासेगाव जवळ फर्टिलायझर कंपनीला

Parenting Tips : पालकांनो! मुलं ऐकत नाहीत म्हणून ओरडू नका, तुमच्या 'या' ५ चुका वेळीच सुधारा

Amravati Crime: कबूतर चोरीवरून २ जिवलग मित्रांची हत्या, सरपंचासह ७ जणांना अटक

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक घटना! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी; पालकांचा संताप

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! बलात्कार प्रकरणात अडकला स्टार खेळाडू, कोर्टाकडून तात्काळ अटक करण्याचे आदेश अन्...

SCROLL FOR NEXT