Railway Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: देवळाली पॅसेंजर गुरूवारपासून धावणार परंतु एक्स्प्रेसच्‍या वेगाने; तिकिट दरातही वाढ

देवळाली पॅसेंजर गुरूवारपासून धावणार परंतु एक्स्प्रेसच्‍या वेगाने; तिकिट दरातही वाढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ– देवळाली पॅसेंजर पुन्‍हा धावणार आहे. येत्‍या १५ सप्‍टेंबरपासून ही पॅसेंजर एक्स्प्रेस (Railway) होवून मार्गस्‍थ होणार आहे. यामुळे तिकिटाचे दर देखील वाढणार आहेत. अर्थात प्रवाशांना सोयीची ठरत असलेली गाडी सुरू होत असल्‍याने दिलासा मिळत आहे. परंतु, प्रवाशांना भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. (Jalgaon Railway News)

कोरोनाच्‍या (Corona) काळात सर्वच रेल्‍वे गाड्या बंद झाल्‍या होत्‍या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर हळूहळू रेल्‍वे सुरू झाल्‍या. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून (Bhusawal) भुसावळ देवळाली पॅसेंजर ही बंदच होती. येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

४० टक्‍के तिकिट दर वाढ

देवळाली पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. यामुळे तिकीट दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. भुसावळहुन सुटणाऱ्या या देवळाली पॅसेंजरचे पूर्वी भुसावळ देवळालीपर्यंतचे तिकीट ५५ रूपये होते. मात्र, ४० टक्के तिकीट दरवाढीमुळे भुसावळ ते देवळालीचे तिकीट ५५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपयांच्या घरात आकारण्यात येणार आहे. तसेच जळगाव ते चाळीसगावचे तिकीट हे पूर्वी २५ रूपये होते ते ५० रूपये होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

KBC 17: कृष्णाने अचानक अमिताभ बच्चन यांना विचारली त्यांची फी; बिग बी उत्तर देत म्हणाले...

Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT