बीएचआर घोटाळा 
महाराष्ट्र

बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे २८ बँकांवर पत्रबाण

बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे २८ बँकांवर पत्रबाण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची बँक खाती, एफडी, कर्ज आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कायद्याचे शस्त्र उपसले असून आज सायंकाळपर्यंत पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल २२ बँकांना समजपत्र तर सहा बँकांना स्मरणपत्र दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-BHR-scam-Pune-Financial-Crimes-letter-to-28-banks)

बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती देण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणाऱ्या जळगावातील काही बॅंका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले असल्याची खळबळजनक माहिती आज सकाळी समोर आली होती. बीएचआर घोटाळ्यातील आरोपींचे बँक खाते, एफडी,कर्ज आदी संबंधी माहितीसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावातील एसबीआय, कोटक, देवनागरी, जनता, युनियन, पीपल्स आदी बँकेसोबत काही दिवसांपासून पत्रव्यवहार सूरु होते. परंतू बँकांकडून अपूर्ण किंवा चुकीची माहिती पुरवली जात होती. या गोष्टींचा बीएचआर घोटाळ्याच्या तपासावर गंभीर परिणाम होत होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित बँकांना आज पत्र देण्यात आले. त्यात २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र देण्यात आल्याचे कळतेय.

बँकाचे असहकार

आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागील दोन-तीन दिवसापासून जळगावात ठाण मांडून आहे. या पथकाने मागील दोन दिवसात साधारण ४० ते ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यानंतर आज दिवसभर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध बँकांमध्ये भेटी दिल्यात. त्यात २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र देण्यात आली. यातील एका बँकेने तात्काळ माहिती दिली. तर काही बँकांनी दोन दिवसात माहिती देण्याचे आश्वासन दिले असून उर्वरित बँकांनी अद्यापही सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात येतयं.

दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिवसभर जळगावातील विविध शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहारांसह प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या. त्यासह आज दिवसभारत अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने साधारण ५-६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. साक्षीदारांच्या महत्वपूर्ण जबाबातून महत्वपूर्ण माहिती मिळाली असल्याचेही कळतेय. गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने आर्थिक शाखेच्या पथकाचा हा जळगाव दौरा महत्वपूर्ण ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT