IPL Betting Saam tv
महाराष्ट्र

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; जळगावात छापा टाकत कारवाई

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा; जळगावात छापा टाकत कारवाई

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात फातिमानगर येथे सट्टा खेळला जात असल्याचे प्रकार उघडकिस आला. सहाय्यक अधिक्षक कुमार चिंता यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा (IPL Betting) टाकून तिघांना अटक केली. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. (jalgaon news Betting on IPL cricket matches police Raid action in Jalgaon)

जळगावातील (Jalgaon) फातेमानगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी आयेशा किराणाजवळ छापा टाकला.

तिघे ताब्‍यात

पथकाने केलेल्या कारवाईत इम्रान अमीन खान (वय ४० रा. चिखली ह.मु.फातेमानगर), वसीम सैय्यद कामरोद्दीन (वय ३८), जावेद नबी शेख (वय ३० रा. फातेमा नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. जळगावात यंदाच्या आयपीएलमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

SCROLL FOR NEXT