महाराष्ट्र

बहिणाबाईंची ‘अरे संसार संसार..’ कविता चक्क तव्यावर चित्रीत!

जळगावच्या माहेरवासीन असलेल्‍या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने बहिणाबाईंची गाजलेली कविता तव्‍यावर उतरविली

संजय महाजन

जळगाव : "अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तवा मियते भाकर..’ बहिणाबाईंच्या या कवितेच्या जीवन विषयक आशय मुल्यांना चक्क तव्यावर तेही बहिणाबाईंच्या प्रतिमेसह आकर्षक रंगात चित्रित केले आहे. निमित्‍त राहिले ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याचे. (jalgaon-news-Bahinabai's-poem-Are-Sansar-Sansar-is-painted-on-a-beautiful-tawa)

मानवसेवा विद्यालय जळगाव शाळेचे चित्रकार सुनील दाभाडे यांनी जळगावच्या माहेरवासीन असलेल्‍या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने बहिणाबाईंची गाजलेली कविता तव्‍यावर उतरविली. बहिणाबाईंची कविता प्रकाशित झाल्यानंतर आजतागायत अनेक कलावंतांनी त्यांच्या कवितांवर इल्युस्ट्रेशन कागदावर, कॅनव्हासवर केले आहे. परंतु चक्क तव्यावर ही कविता अभिनव पद्धतीने चित्रित करून दाभाडे यांनी कवितेचा हा कलात्मक सत्कारच केला आहे. त्यामुळे बहिणाबाई चौधरी परमानंदाने स्वर्गात आत्मतृप्त होतील. अवलिया चित्रकार दाभाडे यांच्या अतर्क्य, अतुलनीय कलाप्रवासात नेहमी मानवसेवा मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलीया सर्व पदाधिकारी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया आंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, शिक्षक वृंद यांच्‍यासह अनेकांचे सहकार्य लाभत आहे.

दाभाडेंनी भाकरीवर काढले बाबासाहेब..

चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी यापूर्वी अतिशय कल्पकतेने प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले होते. ही पोस्ट अल्पावधीत प्रचंड व्हायरल झाली. याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने जगातली पहिली ज्वारीच्या भाकरीवरील बाबासाहेबांची पेंटिंग म्हणून नोंद घेत दाभाडेंचा गौरव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT