university exam 
महाराष्ट्र

उन्‍हाळी परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांना पुन्‍हा संधी; विद्यापीठाचा निर्णय

उन्‍हाळी परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांना पुन्‍हा संधी; विद्यापीठाचा निर्णय

Rajesh Sonwane

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिले होते. अशा विद्यार्थ्यांना पुन्‍हा संधी देत फेर परीक्षा घेण्याचा निर्णय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाने घेतला आहे. याकरीता २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. (jalgaon-news-bahinabai-choudhary-University-decision-again-for-students-deprived-of-summer-exams)

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थींची परीक्षा ८ जून ते ३१ जुलै २०२१ दरम्‍यान झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेच आयोजन करण्याच्या निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा २३ ते २५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरा याद्वारे घेण्यात येणार आहेत.

लिंकवर जावून द्यावी परीक्षा

संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या https://nmu.unionline.in या लिंकवर जाऊन परीक्षा द्यावयाची आहे. तसेच उपरोक्त कालावधीतील बहिस्थ लेखी परीक्षांमधील जे विद्यार्थी बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित राहीले किंवा नापास झाले असतील अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलवता २१ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करून त्यांचे गुण २३ ऑगस्टपर्यंत विद्यापीठात पाठवावे.

अर्ज केलेल्‍यांनाच संधी

या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांनी ८ जून ते ३१ जुलै २०२१ पर्यंत झालेल्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर केले असलेल्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेला प्रविष्ठ होता येईल. याबाबत काही अडचणी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी अशी माहिती परीक्षा व मुल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. किशोर पवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंचितचा मोर्चा हा निवडणूकीसाठी स्टंटबाजी : आरएसएस

Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bank Holiday in November : नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

PSI Gopal Badne: महिला डॉक्टरवर चार वेळा बलात्कार, कोण आहे संशयित आरोपी PSI गोपाल बदने? VIDEO

SCROLL FOR NEXT