Minor girl torture saam tv
महाराष्ट्र

दुचाकीवरून येत काढली छेड; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची गावातीलच एका तरुणाने छेड काढत विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने पिकांवर फवारणीसाठीचे विषारी औषध सेवन करून व हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयितास ताब्यात घेतले असून, अल्पवयीन मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. (jalgaon news Attempted suicide of a minor girl by torture)

ग्रामीण भागातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी (Jalgaon News) गावातच राहणाऱ्या आपल्या काकाच्या घरी पायी जात होती. या दरम्‍यान दुचाकीवरून आलेल्या युवकाने तिची छेड काढली. खांद्यावरील ओढणी ओढून अश्लील शब्दफेक करत पुढे जाऊन ओढणी जमिनीवर फेकून दिली. हा प्रकार पीडितेने आई, वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी संशयितास भेटून असे पुन्हा न करण्याबाबत समज दिली.

विषारी द्रव घेत कापली हाताची नस

परंतु या सर्व (Pachora) प्रकाराचा अल्पवयीन मुलीच्या मनावर प्रचंड विपरीत परिणाम झाला व तिने आपली बदनामी झाली असा विचार करून संतापाच्या भरात दुसऱ्या दिवशी आई, वडील शेतात गेल्यावर पिकांवर फवारणीसाठी असलेले विषारी औषध सेवन केले व आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारच्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. शेतात केलेल्या तिच्या आई, वडिलांना कळवले. ते घरी आल्यानंतर या मुलीस उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून, त्या आधारे सद्दाम अब्दुल पिंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT