Amalner Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Amalner Water Crisis : अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट; विहिरी पडल्या कोरड्या, पाण्यासाठी भटकंती

Jalgaon News : जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींची जल पातळी खालावली आहे. काही गावांमधील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. मार्च महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यात आता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक गावांतील ग्रामस्थांना आपली तहान भागविण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींची जल पातळी खालावली आहे. तर काही गावांमधील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पाण्याची तहान भागविण्यासाठी नागरिकांना दूरवर जावे लागत आहे. 

पाणी योजना होऊनही उपयोग नाही 

तालुक्यातील डांगर गावाला मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. शिरडाणे (ता.धुळे) येथून पांझरा नदीच्या काठावरील विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. मात्र विहिरीतील पाणी पातळी कमी झाल्याने टंचाई जाणवू लागली आहे. अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. काही गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. मात्र, निव्वळ वीजजोडणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा सुरू होत नाही. नगाव बुद्रुक येथेदेखील तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. 

ट्रॅकरची मागणी 

पाणी टंचाईमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. आगामी काळात पाण्याची समस्या अधिक गडद होण्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातून जोर धरू लागली आहे. तसेच ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच पांझरा नदीत आवर्तन सोडल्यास पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याची मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT