Crime Saam tv
महाराष्ट्र

दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले

दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शहरात गांजाची वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून दीड लाखाचा १० किलो गांजा पकडल्याची घटना मंगरूळ येथील माध्यमिक शाळेजवळ घडली. (jalgaon news amalner police arrested One and a half lakh cannabis smuggler)

अमळनेर (Amalner) येथील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे आपले सहकारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, अमोल पाटील, नीलेश मोरे, कैलास पाटील यांच्यासोबत पालखी बंदोबस्तासाठी यात्रेत असताना मंगरूळ शिरूड फाट्याजवळ एक तरुण विक्रीसाठी गांजा आणत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार श्री. हिरे हे सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी गेले असता, संशयिताला पोलिस (Police) येत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पळू लागला.

पाठलाग करून पकडले

पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. संशयित तरुण ताडेपुरा भीमनगर येथील रहिवासी असून त्याचे नाव संतोष अशोक ढिवरे (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याजवळ १ लाख ५० हजार रुपये किमतीचा १० किलो ३८६ ग्रॅम गांजाची दोन पाकीटे मिळून आली. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, संशयित संतोष ढिवरेला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एम. के. पाटील यांनी २० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT