Jalgaon Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: शिंदे गटातील आमदारांच्‍या भगिनीने केले अजित पवारांचे स्‍वागत

शिंदे गटातील आमदारांच्‍या भगिनीने केले अजित पवारांचे स्‍वागत

संजय महाजन

जळगाव : शिवसेनेतून फुटलेले शिंदे गटाचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्‍या भगिनी तसेच शिवसेनेच्‍या नेत्‍या वैशाली सूर्यवंशी यांनी विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) यांचे औक्षण करत स्वागत केले. (Jalgaon News Ajit Pawar)

पाचोरा (Pachora) शहरात आगमनापूर्वी अजित पवार यांचे (Shiv Sena) शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी औक्षण करून पुषगुच्च देत स्वागत केले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या ठिकाणी काही संघटनांनी अजित पवार यांना विविध विषयांचा संदर्भात निवेदनही दिले. येथे स्वागतनंतर अजित पवार हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

आघाडी असल्याने भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समवेत अजित पवार हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत त्यांना निर्मल सिडस्‌ कंपनीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात आर. ओ. तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणा संदर्भातही माहिती देण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी असल्याने यांनी अजित पवार यांनी भेट घेतली असे शिवसेनेचे नेते तसेच बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT