Railway Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसच्या एसी डब्यातून धुर; मोठा अनर्थ टळला

अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसच्या एसी डब्यातून धुर; मोठा अनर्थ टळला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावरून निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसला भुसावळ- जळगाव या दरम्यान रेल्वे रुळावर s-7 या एसी बोगीचे सेंटर ओपन असल्याने एस ७ या बोगीतून धूर निघताना दिसून आले. जळगाव (Jalgaon) स्‍थानकावर गाडी थांबवून आग बंद केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. (Jalgaon news Ahmedabad Baroni Express AC coach fire)

अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेस भुसावळहून (Bhusawal) मार्गस्‍थ झाल्‍यावर जळगाव काही अंतरावर राहिले असताना रेल्‍वेच्‍या एसी बोगीतून धूर निघत असल्‍याचे लक्षात आले. यानंतर एक्सप्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगाव रेल्‍वे (Railway) स्‍थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी केली.

अग्निशामक बंब येण्यापुर्वीच आग आटोक्‍यात

महापालिकेचे तीन अग्निशामक दलाचे (Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन बंब पोहचण्याआधीच रेल्वेच्या टेक्निशियन सेंचर ओपन करून वाढणारी आग बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगाव रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. काही वेळात आग आटोक्यात आल्याने काही वेळात धुर निघणे बंद झाल्याने जळगावकडून अहमदाबादकडे रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा टीमची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा मिळवला जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT