Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: एकवर्षाची शिक्षा भोगुन आला अन्‌ पुन्‍हा मंदिरात केली चोरी

एकवर्षाची शिक्षा भोगुन आला अन्‌ पुन्‍हा मंदिरात केली चोरी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरासह विविध मंदीरातील साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) अटक केली आहे. सुरेश बबनराव केवारे (वय ६५ मुळ रा. खामगांव, बुलढाणा ह.मु जळगांव (Jalgaon) रेल्वे स्टेशन मागे) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. (Letest Marathi News)

जळगावतील गजानन नगरामधील जागृत महादेव मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा जिल्हापेठ पेालिस (Police) ठाण्यात दाखल आहे. अटकेतील सुरेश केवारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार (Crime News) असून गजानन नगरातील चोरीच्या घटनेत केवारे असल्याची गुप्त माहिती निरीक्षक किशनराव नजनपाटिल यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, हरीष परदेशी यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन मागील पुलाखालून सुरेशला ताब्यात घेतले.

आणखी काही चोरीच्या घटना

पोलिसांनी खातरपाणी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून शहरातील आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापुर्वी सुरेश कैवारे याला जळगांव शहर पोस्टे मंदीरातून साहित्य चोरीच्या गुन्‍ह्यात १ वर्ष शिक्षा झालेली आहे. शिक्षा भोगुन आल्यावर त्याने पुन्हा चोरीचा धंदा सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT