Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: हळदीच्‍या कार्यक्रमावरून येताना अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, अन्‍य एक गंभीर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असलेल्या दोघांच्या दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात (Accident) दुचाकीस्वार ठार झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. (Jalgaon News Accident News)

अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उर्फ आश्विन गोकुळे सोनवणे (वय-२२, रा. हरीओमनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे तर गणेश भावलाल कोळी हा गंभीर जखमी झालेला आहे.

निखील उर्फ आश्विन सोनवणे हा तरूण आसोदा रोडवरील हरीओम नगरात वास्तव्याला होता. ७ जुलैला निखील व त्याचा मित्र गणेश भावलाल कोळी (रा. आसोदा रोड जळगाव) असे देाघेही मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रमासाठी कुसुंबा येथे दुचाकी (एमएच १९ डीजे ८८४१) ने रात्री गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर निखील आणि गणेश हे दोघे दुचाकीने घरी येण्यासाठी रात्री १२ वाजता कुसुंबा येथून निघाले. दुचाकीने येत असतांना रेमंड चौफुलीजवळून जात असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून येवून जोरदार धडक दिली. या अपघातात निखील सोनवणे हा ठार झाला. तर गणेश कोळी हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्या ११ दिवसानंतर निखीलचे नातेवाईक रतीलाल संतोष सोनवणे (रा. हरीओम नगर, आसोदा रोड, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबत एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT