Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : दुचाकी विद्युत पोलवर धडकून अपघात; इसमाचा जागीच मृत्यू

Jalgaon News : नागरिकांनी त्यांना जिल्‍हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कंपनीला सुटी असल्याने घरात आवश्यक असलेला किराणा करण्यासाठी जळगावी आले होते. (Jalgaon) किराणा करून घरी जात असताना दुचाकी विद्युत पोलवर धडकून झालेल्या अपघातात इसमाचा जागीच (Death) मृत्यू झाला. हा अपघात शिरसोली (ता.जळगाव) येथे घडला. (Maharashtra News)

कबीर भिवा चव्हाण (वय ४४, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत कबिर हे एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. तर शिरसोली गावात आई, पत्नी, २ मुले, भाऊ यांच्यासह रहायचे. दरम्यान १० फेब्रुवारीला सुटी असल्याने ते जळगावहून किराणा घेऊन घरी शिरसोलीला जात असतांना नेहरुनगर परिसरात (Accident) आले असता त्यांची दुचाकी वीजेच्या खांबावर आदळली. यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्‍हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटूंबीयांचा आक्रोश
चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. किराणा घेण्यासाठी जळगावी आले अन्‌ परतताना झालेल्या अपघातात मृत्युमूखी पडल्याने कुटूंबाचा आधार हिरावुन गेला आहे. एमआयडीसी (Police) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 कोटी नोकऱ्या जाणार? नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, वाचा खास रिपोर्ट

Blouse Designs: उन्हाळ्याच्या सीझनसाठी खास कॉटन ब्लाउज, पहा शानदार फॅन्सी डिझाइन्स

मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

Maharashtra Live News Update: पुण्याहून शिरूरकडे जाणारी ट्रॅव्हल बस पेटली

Fact Check : गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार? मोबाईलमधील इंटरनेटही चालणार नाही?

SCROLL FOR NEXT