Accident Saam tv
महाराष्ट्र

पोलिस होण्याचे दोघांचेही स्‍वप्‍न अपुर्ण; अपघातात विद्यार्थी विद्यार्थिनीचा मृत्यू

पोलिस होण्याचे दोघांचेही स्‍वप्‍न अपुर्ण; अपघातात विद्यार्थी विद्यार्थिनीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : जळगाव येथील आयुष अकादमीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी पिकअपच्या धडकेत मृत झाल्याची घटना घडली. विद्यार्थिनी जळगावची तर विद्यार्थी भामरे (ता. चाळीसगाव) येथील आहे. पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (jalgaon news accident news Student dies in accident)

जळगाव (Jalgaon) येथे आयुष अकादमीत तेजस महेर (वय 20) हा विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असून गुरुवारी जळगाव येथे सैन्य भरतीची पूर्व परीक्षा देऊन तो लोहटार (ता. पाचोरा) येथे नातेवाईकांकडे मुक्कामी होता. गाळण (ता. पाचोरा) येथे बारावी मराठीचा पेपर देण्यासाठी येणाऱ्या जळगाव येथील पायल पवार (वय 19) ही विद्यार्थिनी जळगाव रेल्वे स्थानकावरून जलद गाडीत बसली.

तरूणीला उतरावे लागले चाळीसगाव

गाडी पाचोरा येथे न थांबल्याने पायल चाळीसगाव (Chalisgaon) स्थानकावर उतरली. तिने आयुष्य अकादमीच्या शिक्षकांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी याच अकादमीचा विद्यार्थी तेजस महेर यास भ्रमणध्वनीवरून सांगितले, की पायल पवारचा गाळण येथे बारावीचा पेपर असून ती चाळीसगाव रेल्वे (Railway) स्थानकावर असल्‍याचे सांगितले. यानंतर तेजस आपल्या नातलगाची दुचाकी (क्र. एमएच 14 जीक्यू 4144) घेऊन चाळीसगाव रेल्वेस्थानकावर गेला.

भरधाव गाडीची धडक

तेथून पायलला घेऊन दूचाकीने गाळणकडे येत होते. दरम्‍यान भडाळी -भामरे रोडवर भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीस धडक (Accident) दिली. त्यात तेजसचा जागीच मृत्यू झाला. तर पायलला जखमी अवस्थेत चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झाला. तेजस व पायल हे दोघे जळगाव येथे आयुष्य अकादमीत पोलीस भरतीची तयारी करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT