Jalgaon Chopda Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News : सख्ख्या बहिणी शेतातून घरी निघाल्या, वाटेतच नराधमाने गाठलं; भयानक घटनेनं जळगाव हादरलं

Jalgaon Chopda Taluka News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली.

Satish Daud

शेतातून घरी परतणाऱ्या अल्पवयीन बहि‍णींना वाटेतच एका नराधमाने गाठलं. लहान बहिणीच्या डोळ्यासमोरच त्याने मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर दगडाने ठेचून तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह कापसाच्या शेतात फेकून दिला.

तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. यासाठी त्यांनी रविवारी चोपडा शहरात (Jalgaon News) मोर्चा देखील काढला होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी शनिवारी शेतात गेल्या होत्या. तेथून दोघीही परतत असताना वाटेतच अल्पवयीन आरोपीने त्यांना अडवलं. यातील मोठ्या बहिणीला मारहाण करत त्याने जवळच्याच शेतात नेलं.

तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. आरोपीने इतक्यावरच न थांबता पीडितेची दगडाने ठेचून हत्या देखील केली. हा संपूर्ण प्रकार पीडितेच्या लहान बहिणीने आपल्या डोळ्यासमोर घडला. तिने गावात धाव घेत आरडाओरड करत या घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. गावकऱ्यांनी पीडित मुलीची शोधाशोध केली असता जवळच असलेल्या एका कापसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह निवस्त्र अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचमाना करून पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला.

जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. आरोपीला विरवाडे -आडगाव रस्त्यावरून अटक करण्यात आली. सध्या पोलीस घटनेचा सखोल तपास करीत आहेत. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT