Jalgaon News Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon News: हृदयद्रावक! झोका घेताना फास लागला, दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News: जळगावातील नशिराबाद येथे घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या दोरीचा फास लागून दीड वर्षांच्या सार्थकचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या दोरीचा फास लागून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजर्षी छत्रपती शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. सार्थक योगेश बन्हाटे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे बन्हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक घरातील झोपाळ्यावर खेळत होता. त्यावेळी झोक्याच्या दोरीचा त्याच्या गळ्याला फास लागला. खेळता खेळता हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सार्थकची आई घराबाहेर कपडे धुण्यासाठी गेली होती. आई कपडे धूवुन घरात परतल्यानंतर तिला सार्थक झोक्याजवळ अडकलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी घाबरून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या अशा अचानक आणि दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. काही क्षणांपूर्वी घरात खेळणाऱ्या सार्थकचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर हतबल झाले आहेत. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. नशिराबादमधील या हृदयद्रावक घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी असलेल्या झोपाळ्यांच्या दोऱ्या, साखळ्या किंवा इतर भागांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुले झोपाळ्यावर खेळत असताना पालकांनी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. घरातील अशा वस्तूंची नियमित तपासणी करून मुलांच्या आवाक्यात धोकादायक वस्तू राहणार नाहीत, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमधील ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

Kanpur Plane Crash: मोठी दुर्घटना! ट्रेनी विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; उड्डाण भरताच हवेतच मोठा स्फोट

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Kitchen Cleaning : भांड्यांचा चिकटपणा आणि तेलकटपणा १० मिनिटांत होईल गायब; हे घरगुती उपाय करा ट्राय

Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT