Muktainagar News Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar News : अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणारा एकजण ताब्यात; दोघे अजूनही फरार

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील बोदवड- मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असताना बोदवड- मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर प्रचारादरम्यान गोळीबार झाल्याची घटना काल (५ नोव्हेंबर) घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत एका जनाला ताब्यात घेतले आहे. मात्र अन्य दोघे अजूनही फरार आहेत. 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड- मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर त्यांची प्रचार फेरी सुरू असतांना दुचाकीवर असलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर हे पसार झाले होते. याप्रकरणी (Bodwad) बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोदवड आणि मुक्ताईनगर पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारे अवघ्या बारा तासात गुन्ह्याचा छडा लावला आहे. 

गोळीबार झालेल्या प्रकरणात पोलीसांनी तपास करत एका हल्लेखोराला शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. मात्र सदर प्रकरणातील दोन संशयित अद्याप फार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा देखील शोध पोलीस घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT