Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock: पाणी भरताना विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू

Muktainagar News : आई, वडील, भाऊ आणि मोठी बहीण मजुरीसाठी शेतात गेल्याने राधिका एकटी घरी होती.

Rajesh Sonwane

जळगाव  : घरी एकटी असल्याने घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावली. मोटार सुरु असताना पिन काढत असताना (Electric Shock) विजेचा धक्का लागल्याने नऊ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. दिवाळी (Jalgaon) पवार्तच पिंप्राळा (ता. मुक्ताईनगर) येथे ही घटना घडली. राधिका पुरुषोत्तम कहाते, असे मृत बालिकेचे नाव आहे. (Breaking Marathi News)

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील पुरुषोत्तम कहाते कुटुंबीयांसह मोलमजुरी करतात. दरम्यान ११ नोव्हेम्बरला दुपारी बाराच्या सुमारास हि घटना घडली. आई, वडील, भाऊ आणि मोठी बहीण मजुरीसाठी शेतात गेल्याने राधिका एकटी घरी होती. नळांना पाणी आल्याने ते भरण्यासाठी राधिका मोटर सुरू करून पिन लावण्यासाठी मोटरीजवळ गेली. मात्र पिन सुटून तिच्या अंगावर पडली आणि विजेचा धक्का लागून ती जागेवरच कोसळली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेजारी राहणारे भागवत पडोळकर यांनी तिच्या अंगावरील पिन काढली. मात्र राधिका मृत झाली होती. घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटना घडली यावेळी राधिकाबरोबर तिच्या मैत्रीणी देखील होत्या. त्या घरासमोरील वाड्यात खेळत होत्या. मात्र नळाला पाणी आल्याने राधिकाने सर्वांना वाड्याच्या बाहेर काढून मोटर सुरू करून पाणी भरले. नळाचे पाणी गेल्यावर तिने वीज प्रवाहातच पिन ओढली आणि ती तिच्या हातात आली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT