धक्कादायक! कोंबडीचे पिल्लू मारल्याच्या रागातून मालकाने मांजरीवर झाडली गोळी Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! कोंबडीचे पिल्लू मारल्याच्या रागातून मालकाने मांजरीवर झाडली गोळी

मांजरीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव - आपली कोंबडीचे पिल्लू खाल्ल्याच्या रागातून एका माथेफिरुन एअरगनच्या साह्याने मांजरीवर गोळी घालून तीला गंभीर जखमी केले. हा धक्कादायक प्रकार वाघ नगर परिसरात घडला आहे. मांजरीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे देखील पहा -

वाघ नगर परिसरात पुष्पराज बाणाईत यांचे निवासस्थान आहे. बाणाईत व त्याच्या कुटुंबियांकडून अनेक भटक्या मांजरीचे संगोपन केले जाते. बाणाईत यांच्या घराजवळ राहणाऱ्या हेमराज सोनवणे या तरुणाने कोंबडीचे पिल्लू पाळले आहेत. बाणाईत यांच्या घरात येणाऱ्या एका भटक्या मांजरीने हेमराज सोनवणे यांच्या घरातील एक कोंबडीवर हल्ला केला.

कोंबडीचे पिल्लू मांजर पकडून नेत असल्याचे लक्षात येताच हेमराज सोनवणे याचा राग अनावर झाला आणि त्याने छऱ्यांच्या एअरगनने मांजरीवर गोळी झाडली. यात मांजरीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत बाणाईत यांनी हेमराज यास जाब विचारला असता बेजबाबदारपणाचे उत्तर देण्यात आले. ‘त्या काळ्या मांजरीचा देखील मी जीव घेईल’ अशी धमकी त्याने दिली. याबाबत बाणाईत यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत हेमराजविरुध्द तक्रार दिली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेपरफुटी, खासगीकरण, आरक्षण; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे काय म्हणाले?

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

SCROLL FOR NEXT