Jamner News Saam tv
महाराष्ट्र

Jamner News : कांग नदीला महापूर, क्लासला जाणाऱ्या तरुणीचा तोल गेला अन्... , जामनेर तालुक्यात खळबळ

Jalgaon News : कांग नदीला पूर असल्याने ती नदीतील पुराच्या पाण्याकडे पाहत होती. याच वेळी तिचा तोल जाऊन ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : सकाळी क्लास असल्याने नेहमीप्रमाणे पहाटे उठून जामनेरला क्लाससाठी आज देखील निघाली होती. मात्र या तरुणीवर काळाने झडप घातल्याची घटना घडली आहे. नदीवरून पायी रस्ता पार करत असताना तरुणीचा तोल जाऊन ती पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८) असे या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.

जामनेर (Jamner) तालुक्यातील खादगाव येथील पूनम बाविस्कर ही रोज सकाळी जामनेरला क्लाससाठी यायची. रोजप्रमाणे आज सकाळी देखील क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात हि दुर्दैवी घटना घडली आहे. पुलावरून वाहने जात असल्याने पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती. कांग नदीला पूर असल्याने ती नदीतील पुराच्या पाण्याकडे पाहत होती. याच वेळी तिचा तोल जाऊन ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. 

सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविली असता मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रातील काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. पूनमचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT