Jamner Fire News Saam tv
महाराष्ट्र

Jamner Fire News : गॅस गळतीने सहा घरांना आग; संसार आले उघड्यावर, जळगाव जिल्ह्यातील आगीची दुसरी घटना

Jalgaon News : आग इतकी भयंकर होती कि, आजूबाजूच्या घरांनाही याचा फटका बसला आहे. या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या

संजय महाजन

जळगाव : घरात असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे झोपडीला आग (fire) लागल्याची घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूरपासून जवळ असलेल्या पिंपळगावपिंप्री गावात (Jalgaon) दुपारच्या सुमारास घडली आहे. यात सहा घरे जळून खाक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. (Breaking Marathi News)

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सकाळी केमिकल फॅक्ट्रीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती. यामुळे दोन कंपन्यांमध्ये आग लागून यात प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच कंपनीत काम करणारे १७ ते १८ कामगार यात गंभीररीत्या भाजले गेले आहेत. (Fire Brigade) अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यास ३ ते ४ तासांचा कालावधी लागला. कंपनीतील ही आग शमत नाही; तोच जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग लागल्याची घटना घडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसार उघड्यावर  

जळगाव जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्यातील फत्तेपुरजवळील पिंपळगावपिंप्री गावात गॅस गळतीमुळे दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत सहा घरे जाळून खाक झाली आहेत. ही आग इतकी भयंकर होती कि, आजूबाजूच्या घरांनाही याचा फटका बसला आहे. या आगीमध्ये घरातील सर्व धान्य, टीव्ही, फ्रिज यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये काही मोटरसायकलींचे देखील नुकसान झाले असून या आगीच्या घटनेत १६ बकऱ्या देखील; जळाल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT