Jamner Crime Saam tv
महाराष्ट्र

Jamner Crime : पैसे मोजून देण्याचे सांगत २० हजार हिसकावून चोरटा पसार; तोंडापूर येथील बँकेतील प्रकार

Rajesh Sonwane

तोंडापूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील आयडीबीआय बॅकेच्या आत प्रवेश करत पैसे मोजून देतो; या बहाण्याने शेतकऱ्याचे २० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

तोंडापूर फर्दापुर (Jamner) रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयडिबिआय बँकेच्या शाखेत आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ढालसिंगीचे शेतकरी योगेश गाढवे हे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी ५० हजार रुपयांची रोकड काढली. यावेळी त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने तुमच्या नोटा फाटलेल्या असल्याने मोजुन देतो; अस म्हणत गाढवे याच्या हातातून २० हजाराचे बंडल घेतले. यानंतर ते खिशात घालून बॅकेच्या (Bank) बाहेर उभ्या असलेल्या दोन साथीदारांसह दुचाकीने पळ काढला.  

शेतकऱ्यांने आरडाओरडा केल्याने बॅक मनेजर व कर्मचारी जमा झाले. झालेला सर्व प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकाराने बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. बॅकेत सुरक्षा रक्षक असता तर हा प्रकार घडला नसता; अशी चर्चा होत आहे. या प्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

SCROLL FOR NEXT