Jamner Crime Saam tv
महाराष्ट्र

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Jalgaon News : गाडी घेऊन ते बंगळूर येथे जाणार असल्याने ते जेवणासाठी घरी आले. ते निघणार यापूर्वीच सायंकाळी त्यांचा तरुण मुलगा सुमीत हा दारूच्या नशेत घरी आला

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : दारूच्या नशेत राहणाऱ्या मुलाने जन्मदात्या बापाचीच हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील पळसखेडा बुद्रूक येथे घडली आहे. वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने हे कृत्य केले असून संशयित आरोपी मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

बाजीराव पवार (वय ५८) असे या घटनेत (Jamner) मृत झालेल्या बापाचे नाव आहे. बाजीराव पवार हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गाडी घेऊन ते बंगळूर येथे जाणार असल्याने ते जेवणासाठी घरी आले. ते निघणार यापूर्वीच सायंकाळी त्यांचा तरुण मुलगा सुमीत हा दारूच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला (Crime News) असता सुमितने खिशातून चाकू काढून धारदार शस्त्राने वडिलांच्या मानेवर वार केले. 

मुलाने शस्त्राने वार केल्यानंतर बाजीराव पवार हे जखमी अवस्थेतच घराबाहेर पडत झाडाखाली बसले. तेथेच चक्कर येऊन खाली कोसळले. यावेळी गावातील नागरिकांनी उचलून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणत असतानाच बाजीराव यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुमितच्या त्रासाला कंटाळून त्याची आई व बहीणही बाहेरगावी निघून गेले होते. (Jalgaon Crime) आठवडाभरातील जामनेर तालुक्यातील ही दुसरी घटना असून, १२ मेस मुलानेच पैशासाठी आईचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT