Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचा दबदबा! ११ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले आहे. शिवसेना शिंदे गटाचे ६, भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ असे एकूण ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून, या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. बँकेच्या एकूण जागांपैकी तब्बल ११ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) चे ६, भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे २ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजेनंतर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर ११ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी बाजी मारली आहे.

अर्ज माघारीच्या दिवशी पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोऱ्यातील सुमित किशोर पाटील, अनुसूचित जाती प्रवर्गातून आमदार चंद्रकांत सोनवणे, भडगाव येथून सोमसिंग खुमानसिंग पाटील, पाचोरा येथील आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील आणि त्यांच्या मातोश्री नलिनी चिमणराव पाटील (पारोळा) यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, भाजपकडून जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, चोपडा येथून रोहित निकम आणि भुसावळमधून रजनी सावकारे बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून शेवटच्या दिवशी धरणगाव येथून सोनल संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली; तर माघारीच्या एक दिवस आधीच अमळनेर येथील जयश्री अनिल पाटील या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता ११ जागांचा निकाल स्पष्ट झाला असून, या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. उर्वरित जागांवर आता नेमकी कोणाकोणात लढत होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाहा बिनविरोध जागांवर कोण कोण निवडून आले?

शिवसेना शिंदे गट

मंत्री गुलाबराव पाटील

आमदार चंद्रकांत सोनवणे

सुमित किशोर पाटील

मृणाल अमोल पाटील

नलिनी चिमणराव पाटील

सोमसिंग खुमानसिंग पाटील

भाजप

मंत्री गिरीश महाजन

रोहित निकम

रजनी सावकारे

राष्ट्रवादी अजित पवार गट

सोनल संजय पवार

जयश्री अनिल पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! पोलिस पाटलाची हत्या, रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करत संपवलं

Student Scholarship: आता 124 नवीन अभ्यासक्रमांसाठीही शिष्यवृत्ती अन् निर्वाह भत्ता योजना लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Low BP Symptoms: अचानक BP Low झाला तर काय करावं? त्वरीत कोणते उपाय करावेत?

Maharashtra News Live Update: ठाणे मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; ११ कोटींच्या कोकेन आणि एमडीसह तीन परदेशी नागरिकांना अटक

थोडसं डोकं चालवा आणि मांजरींमध्ये लपलेलं उंदीर शोधून दाखवा, वेळ आहे फक्त १० सेकंद

SCROLL FOR NEXT