Bodwad Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Bodwad Heavy Rain: बोदवड तालुक्यात जोरदार पाऊस; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी

Jalgaon News : बोदवड तालुक्यात जोरदार पाऊस; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा होती. तर मागील महिन्यात रावेर (Raver) तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला होता. तर आता बोदवड तालुक्यांतील लोणवाडीत पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली. यामुळे परिसर जलमय झाला आहे. तर लोणवाडी गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. (Tajya Batmya)

पावसाला सुरु झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सुरवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र काही भागात पाऊस अत्यल्पच झाला होता. तर रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, यावल तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यानंतर पुन्हा एकदा या परिसरात पाऊस झाला आहे. आता बोदवड तालुक्यात अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. यामुळे लोणवाडी परिसरात काही घरात पाणी शिरले होते. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला. 

पिकांचे देखील नुकसान 

यंदा बोदवड तालुक्यात पावसाचे पुनरागमन केले आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसाचा फटका मका, कापूस आणि कडधान्य या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT