Gold Rate Today News  AI image
महाराष्ट्र

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोने-चांदीचे दर घसरले; १ तोळा सोन्याचे दर किती? जाणून घ्या

Jalgaon Gold Silver Rate Today News : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,43,500 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2,05,000 रुपयांवर आला आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे ताजे दर.

Alisha Khedekar

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन्ही सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आजही चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात दरांमध्ये सतत बदल होत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर दर खाली आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीला विशेष महत्त्व असल्याने अनेक ग्राहक दरातील बदलांकडे लक्ष ठेवून आहेत. आज बाजारात चांदीच्या किमतीत प्रति किलो 6,000 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

जळगावच्या बाजारात सोन्याचा दर 1000 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,43,500 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर 6000 रुपयांनी घसरून प्रति किलो 2,05,000 पाच हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा हा दर जीएसटीशिवाय आहे.

सोने-चांदीच्या दरांमध्ये आणखी घसरण होणार ?

दरातील या घसरणीमुळे आगामी काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, मागणी आणि इतर आर्थिक घडामोडींनुसार किमतीत पुन्हा बदल होऊ शकतात. येत्या काही दिवसांत या दरांमध्ये आणखी घसरण होते की पुन्हा वाढ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्टदर्जाचे जेवण दिले जात असल्याचा विद्यार्थिनींचा आरोप

Ramayana OTT : रणबीर कपूरचा 'रामायण' थिएटरनंतर 'ओटीटी'वर कुठे अन् कधी पाहता येणार? आहे मात्र १ अट

Wood Furniture Polishing Tips : घरातील या खास टीप्स वापरुन जुन्या लाकडी फर्निचर करा नव्यासारखे

Konkan Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; कुठे कुठे थांबणार? वाचा

Paneer : पनीर आवडते म्हणून जास्त खाताय? 'या' लोकांनी पनीर खाणे लगेच थांबवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT