Erandol Accident Saam tv
महाराष्ट्र

Erandol Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिलेचा मृत्यू, पतीसह तीन मुले गंभीर

Jalgaon News : शिर्डी येथून दर्शन घेतल्यानंतर रात्रीच परतीच्या प्रवासाला निघाले. सोमवारी रात्री एकच्या सुमारास मुक्ताईनगरला जात असताना पिंपळकोठा गावाजवळ कारला मागून कंटेनरची जोरदार धडक

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील परिवार शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन परतताना त्यांच्या कारला एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळ कंटेनरने जोरदार धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश वासुदेव पाटील हे सुटी असल्याने पत्नी रूपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान शिर्डी येथून दर्शन घेतल्यानंतर ते रात्रीच परतीच्या प्रवासाला निघाले होते. यातच सोमवारी रात्री एकच्या सुमारास मुक्ताईनगरला जात असताना, पिंपळकोठा गावाजवळ त्यांच्या कारला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. 

कंटेनरच्या धडकेत कार दुभाजकावर धडकली 

भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील रूपाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश पाटील यांच्यासह मुलगी खुशी, स्वरा आणि गुरू हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात दाखल केले. 

रुग्णालयात उपचार सुरु 

दरम्यान तिन्ही गंभीर जखमी मुलांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसांत कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार काशीनाथ पाटील तपास करीत आहेत. दरम्यान रात्रीच्यावेळी झालेल्या अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT