Erandol News  Saam tv
महाराष्ट्र

Erandol News : मंडपात घडले दुर्दैवी; लागलेली आग विझवायला गेला असता बसला विजेचा झटका, तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महात्मा फुले युवा क्रांती मंचचे कार्यकर्ते व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजयासाठी बसले होते.

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडपाला अचानक आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या काही जणांनी आग विझविण्यासाठी धावपळ सुरु केली. यात आग विझविण्याचा प्रयत्नात विजेचा जोरदार झटका बसल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एरंडोल शहरात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

एरंडोल शहरातील पंकज गोरख महाजन (वय ३२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्याने गावात जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यानुसार शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महात्मा फुले युवा क्रांती मंचचे कार्यकर्ते व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजयासाठी बसले होते. 

मंडपाला आग लागताच सुरु झाली धावपळ 

दरम्यान जयंती उत्सव कार्यक्रम असल्याने कार्यक्रमानिमित्त मंडप उभारण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मंडपास अचानक आग लागली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांची आग विझवण्यासाठी धावपळ सुरु झाली. याच वेळी मंडपाला लागलेली आग विझवत असतांना पंकज महाजन याचा विजेच्या खांबास स्पर्श झाल्याने त्याला विजेचा झटका बसला. यात तो खाली फेकला गेला.

तरुणाचा मृत्यू 

दरम्यान सोबत असलेल्या तरुणांनी पंकजला लागलीच ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जयंती कार्यक्रमाच्या नियोजनात सहकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT