Erandol Crime Saam tv
महाराष्ट्र

Erandol Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Jalgaon Erandol News : मनीषा हिचा विवाह २०१४ मध्ये सागर सोनार (पल्लीवाल) यांच्याशी झाला होता. सागर नोकरीसाठी पुण्यात गेले. तर त्यांची पत्नी मनीषा एरंडोलला राहत होती चारित्र्यावर संशय घेत मनीषाचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : लग्नाला अकरा वर्ष झाली असताना पतीसह सासरची मंडळाची चारित्र्यावर संशय घेत होते. यातून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल येथे घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

एरंडोल शहरातील ज्ञानदीप चौकात राहणाऱ्या मनीषा सागर सोनार (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान एरंडोल येथे मनीषा सोनार या सासरे श्‍यामकांत सोनार, सासू मंगलबाई यांच्यासोबत वास्तव्याला होती. तर पती सागर सोनार हा नोकरीनिमित्ताने पुण्यात होता. दरम्यान मनीषा हिचा विवाह २०१४ मध्ये सागर सोनार (पल्लीवाल) यांच्याशी झाला होता. सागर नोकरीसाठी पुण्यात गेले. तर त्यांची पत्नी मनीषा एरंडोलला राहत होती. 

वरच्या मजल्यावर घेतला गळफास 

दरम्यान मनीषा सोनार यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती सागर, सासू मंगला पल्लीवाल, जेठ गणेश पल्लीवाल, जेठाणी सुषमा पल्लीवाल हे मनीषाचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. दरम्यान ४ जूनला रात्री सर्वानी सोबत जेवण केले. यावेळी मनीषा या वरच्या मजल्यावर होत्या. जेवणासाठी मुलगा बोलावण्यासाठी गेला असता आतून दरवाजा बंद होता. यामुळे गणेश व त्यांचा चुलत भाऊ हेमंत सोनार वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी खिडकीतून पहिले असताना मनीषा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आली.

दोघांना घेतले ताब्यात 

छळाला कंटाळून मनीषाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबत मृत मनीषाचा भाऊ मनोज पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सागर, सासू मंगलाबाई, जेठ गणेश, जेठाणी सुषमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पती व जेठ यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूर MIDCत आगीचा तांडव

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

Kitchen Tips : वारंवार गॅसचे बर्नर ब्लॉक होतात? या टिप्समुळे 10 मिनिटांत होतील साफ

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारताच्या नंदनवनात आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

SCROLL FOR NEXT