Erandol Accident Saam tv
महाराष्ट्र

Erandol Accident : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; तरुणाचा मृत्यू, एकजण जखमी

Jalgaon News : राजेश हा त्याच्या मित्रासोबत संध्याकाळी जळगावला येण्यासाठी निघाला. पिंपळकोठा गावाजवळ संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले

Rajesh Sonwane

जळगाव : एरंडोल येथून जळगावी घरी येत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पिंपळकोठा गावाजवळ घडली. (Jalgaon) समोरून ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात (Accident) अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. (Breaking Marathi News)

जळगावातील मूळ रहिवाशी व एरंडोल (Erandol) येथे स्थायिक राजेश विनोद बनसोडे (वय २२) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेश हा सध्या एरंडोल येथे मामाकडे राहत होता व बँड पथकात कामाला होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, १४ एप्रिलला राजेश हा त्याच्या मित्रासोबत संध्याकाळी जळगावला येण्यासाठी निघाला. पिंपळकोठा गावाजवळ संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यात दुचाकी घसरून राजेश व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातानंतर नागरिकांनी दोघांना (Jalgaon Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र राजेश याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर त्याच्या मित्रावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राजेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

Pithla Bhakri Recipe: पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी बनवा झणझणीत पिठलं-भाकरी

दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT