Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; इलेक्ट्रिक पोलला धडकून गेली नाल्यात, मोठा अनर्थ टळला 

Jalgaon News : धरणगाव तालुक्यातील लाडली येथे मुक्कामी असलेल्या बसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. या बसमध्ये रोज अपडाऊन करणारे विद्यार्थी जात असतात.

संजय महाजन

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. लाडली गावात मुक्कामी असलेली बस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाना घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. विद्युत पोलला बस धडकून नाल्यात गेली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र अपघात झाल्यानंतर प्रवाशी व विद्यार्थी घाबरल्याने आरडाओरड केली होती. 

धरणगाव तालुक्यातील लाडली येथे मुक्कामी असलेल्या बसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. या बसमध्ये रोज अपडाऊन करणारे विद्यार्थी जात असतात. लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे आज लाडली येथून सकाळी सहाला शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली होती. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगाव जवळील वळणाजवळ हा अपघात झाला.  

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात 

दरम्यान रेल येथून बस मार्गस्थ झाल्यानंतर दोनगाव जवळ आल्यानंतर येथे असलेल्या वळण रस्त्यावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला धडकली. यानंतर बस थेट नाल्यात गेली. पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकल्यानंतर काही मोठा अपघात न झाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

विद्यार्थ्यांची आरडाओरड 

बस अनियंत्रित होऊन बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांद्यावर धडकल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र बसने खांबाला धडक देत थेट नाल्यात गेल्याने विद्यार्थी व प्रवासी घाबरले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी आरडाओरड केल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अपघात घडल्यानंतर दोनगाव येथील ग्रामस्थ लागलीच धावून आले. यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले. तसेच लाडली व रेल येथील पालक व ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

SCROLL FOR NEXT