Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: व्यापाऱ्याला १६ लाखांचा चुना; स्टील मटेरिअल पुरविण्याच्या नावाने फसवणुक

व्यापाऱ्याला १६ लाखांचा चुना; स्टील मटेरिअल पुरविण्याच्या नावाने फसवणुक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : स्टील मटेरिअल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापाऱ्याला १६ लाख २७ हजार ८०० रुपयांमध्ये गंडविले. याप्रकरणी (Jalgaon) जळगावच्या सायबर पोलिसांत दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

मोहनलाल देवजी पटेल (रा. गजानननगर, रावेर) यांचा मुलगा भावेश यांच्या मोबाईल क्रमांकावर १९ नोव्हेंबर २०२२ ला ७७३८७७१८६१ या क्रमांकावरून करण रांका याने फोन (Cyber Crime) केला. त्‍याने स्वत:ची आयएसओ टॉप्स्‌ इंडमेटल ट्रेडर्स नावाची कंपनी असून, बांधकामास लागणारे स्टील मटेरिअल तुम्हाला पुरवठा करण्यात येईल, असे सांगून विश्वास संपादन केला.

व्‍हॉटस्‌ॲपवर ई बिल पाठविले

त्यांना व्हॉट्सॲपवर बनावट टॅक्स इनव्हाईसवरून बनावट ई बिल पाठवून करण रांका व ट्रकचालक राकेश शर्मा या दोघांनी वेळोवेळी ऑनलाईन एकूण १६ लाख २७ हजार ८०० रुपये उकळले. मात्र, मटेरिअयल न पाठवता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी व्यापारी मोहनलाल पटेल यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT