Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅमेलींग

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅमेलींग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरात व्हॉट्सअपवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

सायबर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार जळगाव (Jalgaon) शहरातील रिंगरोड परिसरात २६ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तरुणीच्या व्हॉट्सअप मोबाईलवर तिचे फोटोंचे मार्फींग (Cyber Crime) करुन अश्लाख्य पद्धतीने एडीटींग केले. त्यानंतर पिडीतेसह तिच्या मैत्रिणींना पाठवून त्याची बदनामी केली.

मग केली पैशांची मागणी

तसेच फोटो अधिक व्हायरल न करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने तरुणीला पैशांची मागणी केली. हा प्रकार सहन न झाल्याने तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT