Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: दोन दिवसांनंतर जळगावात पुन्‍हा खून; मध्‍यरात्रीची घटना

दोन दिवसांनंतर जळगावात पुन्‍हा खून; मध्‍यरात्रीची घटना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील निवृत्तीनगरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाचा मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी चॉपरने भोसकून खून (Crime) केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वीच जळगावात (Jalgaon) खूनाची घटना घडली होती. यानंतर पुन्‍हा खूनाची घटना घडल्‍याने जळगाव हादरले आहे. (Jalgaon Crime News)

जळगाव शहरातील निवृत्‍तीनगर परिसराती भावेश उत्तम पाटील (वय ३०) असे मयत इसमाचे नाव आहे. मृत वाळू व्यावसायिक असून त्‍याची हत्या वाळू व्यवसाय व पुर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (२३ ऑगस्ट) भावेश पाटील हा त्यांच्या मित्रांसह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सेंधवा येथे ट्रॅक्टर ट्रॉली सोडविण्याच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजता तो आव्हाणे येथे परतला. घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मी येथे संशयित आरोपी मनीष नरेंद्र पाटील (वय २२, आव्हाणे) व भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द ता. जळगाव) यांच्याशी भावेशचा (Crime News) वाद झाला. त्यानंतर तो घरी दुचाकीने जळगावात निवृत्ती नगर येथे आला.

घरी येऊन घातला गोंधळ

काही वेळाने रात्री १२ वाजेच्या सुमारास संशयित दोघे भावेश याच्या घरी येऊन गोंधळ घालायला लागले. यावेळी भावेश हा घरापासून काही अंतरावर बाहेर गेला. संशयितांशी बोलत असताना संशयित मनीष व भूषण यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळत संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर त्यांच्या मागावर पथक रवाना केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT