Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: चारित्र्याचा संशय; मुलाने जन्मदात्रीला संपविले

चारित्र्याचा संशय; मुलाने जन्मदात्रीला संपविले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : वडली (ता. जळगाव) येथे ४० वर्षीय महिलेस तिच्याच मुलाने लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जिल्‍हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. २८) रात्री बाराच्या सुमारास महिला मृत झाली. अक्काबाई सुभाष भिल असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला (Jalgaon News) जबाबदार असलेला तिचा मुलगा जितेंद्र भिल याला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

वडली (ता. जळगाव) येथे अक्काबाई मुले जितेंद्र आणि अजय भिल यांच्यासह वास्तव्यास होती. सोमवारी वडलीतील भिलवाड्यात लग्न असल्याने संपूर्ण वाडा लग्नात सहभागी झाला होता. कुणीतरी आई अक्कबाईबाबत सांगितल्याने दोघेही भाऊ मामा अरुण भिल यांच्या घरी गेले व त्यांनी त्यांच्या आईची माहिती दिली. मामा अरुण याला घेऊन जितेंद्र व अजय रात्री पावणेअकराला अंबर करणसिंग भिल याच्या घरी धडकले.

दार उघडताच नको तेच घडले

तिघांनी अंबर करणसिंग याच्या घराचे दार उघडले. आत शिरताच अक्काबाई नको त्या अवस्थेत अंबर व त्याचा साथीदार सुकलाल दामू भिल यांच्यासह सापडून आली. जितेंद्र भिल याने लोखंडी सळईने आईवर हल्ला (Crime News) चढविला. गंभीर जखमी अक्काबाई बेशुद्ध पडली, तर अंबर व सुकलाल यांनी घरातून धूम ठोकली. अक्काबाई बेशुद्ध पडल्यावर अरुण भिल यांनी घडलेला प्रकार पोलिस पाटील दिलीप पाटील व सरपंच युवराज गायकवाड यांना कळविला.

उपचारादरम्‍यान चार दिवसांनी मृत्‍यू

जखमी अक्काबाईला तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवसांपासून उपचार सुरू असताना, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अक्काबाईचा मृत्यू झाला. याबाबत मृत अक्काबाई भिल हिचा भाऊ अरुण भिल (वय ३६, रा. वडली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित जितेंद्र भिल यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT