Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : जळगाव जिल्हा हादरला; जुन्या वादातून तरुणाचा खून, रात्रीची घटना

Jalgaon News : जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील एका हॉटेलात रात्री अकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. रात्री हॉटेलात मित्रांसोबत जेवणासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादातून शस्त्राने हल्ला चढविला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना एका हॉटेलात घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील एका हॉटेलात रात्री अकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. किशोर सोनवणे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर व त्याचा मित्र अमोल सोनार हे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये बसले होते. दरम्यान रात्री अकराच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी दोघांवर शस्त्राने हल्ला केला. यात किशोर सोनवणेचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल सोनार गंभीर जखमी आहे. 

सदर घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला. तर मारेकऱ्यांमधील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना शनिपेठ पोलिस ठाण्यात आणले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : २२ नातवंडांच्या ८० वर्षीय आजोबांचं ठरलं लग्न; ५० वर्षीय महिलेसोबत विवाहबंधनात अडकले

Super Duper: 'नाचा दणाना'वर थिरकणार महाराष्ट्र; 'सुपर डुपर'मधील ढिंचॅक गाणं प्रदर्शित

Raj Thackeray Meets Eknath Shinde: २० मिनिटांच्या भेटीत ठरली मोठी राजकीय डील? एकनाथ शिंदेंच्या भेटीमागील 'राज'कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: मनमाड :- पुणे - इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी..

Tooth enamel Repair Tips: 5 सवयी दात करतात खराब, वेळीच व्हा सावध; अन्यथा...

SCROLL FOR NEXT