Chopda Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chopda Crime News : अनैतिक संबंधातून चोपड्यात एकाची हत्या; चार तासात मारेकरी ताब्यात

Jalgaon News : चोपडा शहरातील पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेवून हत्या झाल्याची घटना घडली. मयताचे वय अंदाजे ४० वर्ष असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

संजय महाजन

चोपडा (जळगाव) : अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना चोपडा शहरात घडली आहे. दरम्यान घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासातच मारेकरी संशयितास गोरगावले रोड परिसरातून ताब्यात घेतले. सदरची घटना २३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. 

जळगावच्या चोपडा शहरातील चोपडा शहरातील पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेवून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घटनेतील मयताचे वय अंदाजे ४० वर्ष असून मयत हा कचरा गोळा करणारा व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित राजेश काशीराम बारेला (वय ३३) व याच्यासह अन्य एक महिला भंगार व कचरा वेचण्याचे काम करतात. रात्री दोघे शहरातील अल्पबचत भवनजवळ रहिवास करीत होते. 

दगडाने डोक्यात वार 

दरम्यान शुक्रवारी रात्री त्याच ठिकाणी अज्ञात व्यक्ती आला. यानंतर अज्ञात व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून राजेश बारेला याने संतापाच्या भरात अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर राजेश बारेला व महिला हे दोघेही तेथून निघून गेले होते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

संशयिताला घेतले ताब्यात 

घटना समोर आल्यानंतर चार तासांत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी राजेश काशीराम बारेला यास गोरगावले रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे. संशयिताने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असून, मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT