Duplicate currency Duplicate-currency
महाराष्ट्र

बनावट नोटांचे रावेर कनेक्शन उघड; मोठ्या रॅकेटचा संशय

छिपावड येथील हॉटेलमध्ये शंभराची नोट देऊन नाश्ता करून दहा रुपये खर्च करून ९० रुपये परत घेत होते. ही बाब हॉटेल चालकाच्या निदर्शनास आली.

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील छिपावड पोलिसांनी नकली नोटांप्रकरणी खंडवा येथील दोन जणांना अटक केली. दरम्यान, दोघांच्या चौकशीनुसार रावेर येथील एकास शनिवारी मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. नकली नोटांबाबत मध्य प्रदेश- महाराष्ट्र कनेक्शनबाबत रावेर शहरात चर्चा असून, शहरात खळबळ उडाली आहे. (jalgaon-crime-news-madhya-pradesh-two-parson-arrest-Duplicate-currency-matter-but-raver-connection)

खंडवा येथील अब्रार मेहबूब (वय २०) व आयुब इब्राहिम (४५) हे मध्य प्रदेशातील हरदा व छिपावड येथे मजुरीसाठी गेले होते. छिपावड येथील हॉटेलमध्ये शंभराची नोट देऊन नाश्ता करून दहा रुपये खर्च करून ९० रुपये परत घेत होते. ही बाब हॉटेल चालकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर ८ जुलैला एका चहाच्या टपरीवर चहा व पाऊच घेत असताना हॉटेल चालकाने या दोघांना हटकले. हॉटेलचालक व चहा टपरीमालक व नागरिकांनी या दोघांना चांगला चोप दिला व छिपावड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

इंदूर व रावेर कनेक्‍शन

दरम्यान, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता नकली नोटांचे कनेक्शन मध्य प्रदेशातील इंदूर व रावेर असल्याचे लक्षात आले. इंदूरहून चौकशी केल्यानंतर हरदा उपविभागीय पोलिस अधिकारी रवी शर्मा व छिपावड पोलिसांनी शनिवारी (ता.१०) दुपारी रावेर येथे येऊन रावेर पोलिस ठाण्यात निरीक्षक रामदास वाकोडे, गोपनीय विभागाचे सुरेश मेढे, मंदार पाटील, सुकेश तडवी व पोलिसांशी चर्चा करून रावेर पोलिसांच्या मदतीने येथील उटखेडा रोडवरील पाच बिवियाँ टेकडी येथील बाबू ऊर्फ शेख शकील शेख हाफिज यास संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंतिम तपासात सत्‍य येणार बाहेर

मध्य प्रदेशातील नकली नोटांबाबत रावेर कनेक्शन असल्याची बाब समोर आल्यामुळे शहरात नकली नोटांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या नकली नोटांच्या रॅकेटबाबत छिपावड पोलिसांच्या अंतिम तपासानंतर उघड होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitrupaksha And Crow Importance: पितृपक्षात कावळ्याला अन्न का दिले जाते? कावळ्याचे एवढे महत्व का? समजून घ्या

Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' २ मिनिटात तयार होणारी पेस्ट

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT