Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: आदिवासी तरुणाची हत्या; पाटचारीत आढळला मृतदेह

आदिवासी तरुणाची हत्या; पाटचारीत आढळला मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : अकुलखेडा (ता. चोपडा) येथील ३० वर्षीय आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर (Police) पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) (वय ३०, रा. पिसनाबल, जि. बडवाणी, ह. मु. अकुलखेडा, ता. चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Jalgaon Crime News)

चोपडा (Chopda)- अकुलखेडा रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ दिनेश सस्तेचा मृतदेह आढळून आला होता. दोन ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेचार ते ३ ऑक्टोबरच्या सकाळी साडेदहापूर्वी कुणी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणावरून त्याचा खून (Crime News) केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

पोलिसांकडून तपास सुरू

दिनेशच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत आढळून आली आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT