Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: डोक्यात वार करून रखवालदाराची हत्या; ट्रॅक्टर घेऊन झाला फरार

Jalgaon News : चोरट्याने ट्रॅक्टरचे सामान असलेले अवजड वस्तूने पांडुरंग पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा जागीच खून केला

Rajesh Sonwane

जळगाव : शेतातील घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत चोरट्यांनी रखवालदाराच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वर करून हत्या (Crime News) केली. यानंतर तेथे असलेले ट्रॅक्टर व रोटोव्हीटेर लांबवून नेल्याची घटना जळगाव (Jalgaon) तालुक्यातील वावडदा शिवारात घडली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. (Live Marathi News)

जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात अज्ञातांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रखवाली करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) याचा खून केला आहे. बिलवाडी गावात त्यांच्या परिवारासह राहतात. तसेच बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान मंगळवारी (१४ नोव्हेंबर) ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास शेतामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतमालक शेतात गेल्यानंतर उघडकीस आली घटना 

चोरट्याने ट्रॅक्टरचे सामान असलेले अवजड वस्तूने पांडुरंग पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. यानंतर रोटोव्हीटेर व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. दरम्यान सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा पहाटे ६ वाजता म्हशीचे दूध काढण्यासाठी आले असताना ही घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती सांगितली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT