Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : कामगाराकडून सोन्याचा परस्पर व्यवहार; सराफा व्यापाऱ्याची ९७ हजारात फसवणूक

Jalgaon News : आजघडीला फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. तर काहीजण व्यवहार करून फसवणूक करत असतात

Rajesh Sonwane

जळगाव : आजच्या घडीला कोणावर विश्वास ठेवावा हे सांगणे कठीण झाले आहे. कारण दुकानात काम करणाऱ्या कामगारांकडून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार जळगाव शहरात घडला असून सराफा व्यापाराचा विश्वासघात करून ऑर्डरचे असलेले ९७ हजार ५०० रुपयांचे सोन्याच्या मणींचा परस्पर अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजघडीला फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. तर काहीजण व्यवहार करून फसवणूक करत असतात. मात्र जळगाव शहरात एका सराफ व्यावसायिकाला त्याच्याकडे असलेल्या कामगारानेच (fraud Case) फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील श्रीकृष्णनगरातील अंकुश पुंडलिक सोनवणे (वय ३२) हे सोने खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान ऑगस्ट महिन्यात त्यांच्या ओळखीतला जळगावतीलच योगेश भगवान गोयर (वय ३२) याच्याकडे विश्वासाने ऑर्डरचे असलेले ९७ हजार ५०० रुपयांचे १३ ग्रॅम वजनाचे ७८ सोन्याचे मनी सोपवून सराफा मार्केटमधील अहिरराव मनीवाले यांच्याकडे देण्यास सांगितले होते. मालकाने मोठ्या विश्वासाने सोन्याचे मनी दिले होते. 

मात्र, योगेश गोयल याने ऑर्डरची डिलिव्हरी न करता अपहार करून हे सोन्याचे मनी परस्पर विक्री करून टाकली होती. याबाबत अंकुश सोनवणे यास काहीही माहिती नव्हते. मात्र दिलेली ऑर्डर संबंधित ठिकाणी न पोहचल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात अंकुश सोनवणे यांनी बुधवारी (ता. २७) दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित योगेश भगवान गोयल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT