Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : पाठलाग करत नंबर मागून केला इशारा; जळगावात वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीची रस्त्यावर काढली छेड

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील एका गावात वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीची छेड काढण्यात आली आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला

संजय महाजन

जळगाव : रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रोडरोमिओ संधीचा फायदा घेत तरुणींची छेड काढत असतात. असाच प्रकार जळगाव तालुक्यात घडला असून वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीचा पाठलाग करत तिला इशारे करून छेडखानी काढण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. तर रोडरोमिओं कडून रस्त्यावर मुलींची छेड काढण्याचे प्रकार तर रोजच घडत असल्याचे समोर येत आहेत. तरुणीवर नजर ठेवून तिचा पाठलाग करत तिच्यासमोरून जात हातवारे करण्याच्या प्रकाराला तरुणी त्रस्त होत आहेत. अशातच जळगाव तालुक्यातील एका गावात वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीची छेड काढण्यात आली आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

फोनवर बोल म्हणत केले हातवारे 
दरम्यान जळगाव तालुक्यातील एका गावात शासकीय रुग्णालयात सदर तरुणी हि वैद्यकीय अधिकारी आहे. तरुणी नोकरीला असलेल्या रुग्णालयात जाऊन तसेच रस्त्याने येता- जाताना तिचा सातत्याने पाठलाग करत त्रास दिला जात होता. या तरुणाने तरुणीला तिचा फोन नंबर मागितला. तसेच तू माझ्याशी फोनवर बोल असे म्हणत तिची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

अखेर पोलिसात गुन्हा दाखल 
रोज होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसात धाव घेतली. छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली असून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रस्त्याने येताना जाताना सुद्धा वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीचा पाठलाग करत तरुणाने तिची छेड काढली. त्याचप्रमाणे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रयत्न केले असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT