Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर बाजारात जास्तीचा नफा दाखवून गंडविले; साडेपाच लाखांचा लावला चुना

Jalgaon News : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून समोरच्यांकडून देण्यात येत असलेल्या आमिषाला बळी पडत असल्याने यातून फसवणुकीचे प्रकार घडले आहे. त्यानुसार एसटी कर्मचारी जफ मिळण्याच्या आमिषाचा बळी ठरला आहे

Rajesh Sonwane

जळगाव : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फसवणुकीच्या घटना समोर येत असताना देखील अमिषाला बळी पडत आहे. अशीच घटना जळगावमध्ये समोर आली असून कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याला गंडविण्यात आले आहे. या प्रकरणात साडेपाच लाख रुपयात फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

जळगावच्या अमळनेर शहरातील निवृत्त एसटी कर्मचारी प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९) यांना पाच लाख ६० हजार रुपयांत सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. प्रकाश बडगुजर यांच्याशी १ मेस रिधी वर्मा नावाच्या तरुणीने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला. नंतर आकाश सिंग याने संपर्क करून एका कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांना जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. 

१८ लाखाचा नफा झाल्याचे दाखविले 

बडगुजर यांना गुंतवणूक केल्यास त्यावर अधिकचा नफा होईल, असे सांगून विश्वासात घेतले. यावर विश्वास ठेवत प्रकाश बडगुजर यांनी काही रक्कम गुंतवणूक केली. या गुंतविलेल्या रकमेवर १८ लाख ८५ हजार रुपयांचा नफा झाल्याचे समोरच्यांनी बडगुजर यांना एका ॲपच्या माध्यमातून दाखविले. यामुळे बडगुजर यांचा विश्वास पक्का झाला. यामुळे त्यांनी आणखी रक्कम गुंतविण्याचे सांगितले. 

नफा अन्‌ रक्कमही गेली
दरम्यान नफा मिळत असल्याच्या आमिषातुन बडगुजर यांनी पाच लाख ६० हजार रुपये कंपनीत गुंतविले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे बडगुजर यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत ऑनलाइन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT