Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: ‘हमालची कमाल’..युट्युब पाहून छापल्‍या नकली नोटा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : हमाली काम करत असताना घरातच नोटा छापण्याचा कारखाना उघडला. ते देखील युट्युबवर व्हिडिओ पाहून घरीच २० हजाराच्या नकली नोटा छापून (Jalgaon News) टाकल्या. नोटा चालविण्यासाठी ५० हजारात दीड लाखाच्या नोटा देणाऱ्यास उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. (Letest Marathi News)

जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नकली नोटा (Fake Notes) चलनात आल्या असून पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी बनावट नोटा पकडल्या होत्या. दरम्‍यान बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. बैसाने यांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस कर्मचारी महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांचे पथक तयार केले.

पथकाने सापळा रचून नोटा छपाई करणारा कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (वय ३१) याला बोलाविले. ५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली. आढाव याला संशय आल्याने अगोदर त्याने पोलिसांना चकवा दिला. सुमारे तीन तास पोलिसांना चकवा दिल्यावर त्याने गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले. आढाव दुचाकी घेऊन त्याठिकाणी उभा होता. पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेतले. तसेच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले. पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT