Jalgaon Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जळगाव हादरले! जुन्या वादातून भरदिवसा कुटुंबावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू; ५ गंभीर

Jalgaon violence: जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

जळगावमध्ये जुन्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा मोठा आक्रोश केला. याप्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात २६ वर्षीय मुकेश शिरसाठ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुकेशच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे. हल्लेखोरांनी भरदिवसा तलवार, कोयता आणि चोपरसारख्या घातक शस्त्रांनी हल्ला चढवल्यामुळे परिसरातभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT