Jalgaon Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीस ‘मॅट’ने (महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनल) तात्पुरती स्थगिती (Jalgaon) दिली आहे. याप्रकरणी ९ डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. डॉ. गायकवाड आज पुन्हा पदभार घेणार आहेत, तर नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार एक दिवसाच्या रजेवर गेले आहेत. (Tajya Batmya)

महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. त्यांना कोणतीही पदस्थापना देण्यात आली नव्हती. मात्र, त्यांच्या जळगाव (Jalgaon Corporation) येथील आयुक्तपदी परभणीचे आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही आदेश मिळताच बुधवारी (ता. ३०) पदभारही घेतला. या कालावधीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या. पदभार देताना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा आहे.

‘मॅट’मध्‍ये मागितली दाद

बदलीविरोधात श्रीमती गायकवाड यांनी ‘मॅट’मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्यातर्फे अविनाश एस. देशमुख यांनी बाजू मांडली. महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेऊन आपल्याला केवळ सात महिने झाले आहेत. कोणतेही कारण नसताना बदली करण्यात आली. तसेच आपल्याला कोणतीही नियुक्ती न देता परस्पर पदमुक्त करण्यात आले. शासन नियमाप्रमाणे ही प्रक्रिया झालेली नाही. याबाबत आपल्यालाही विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या याचिकेवर सुनावणी होऊन ‘मॅट’चे व्हाईस चेअरमन पी. आर. बोरसे यांनी या बदलीच्या २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. याप्रकरणी ९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT