Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

Jalgaon News : धनवाडी शिवारातील योगीराज पाटील यांच्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान रेखाबाई बारेला यांची पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कौटूंबिक वादातून धारदार हत्याराने पत्नीची हत्या करून पती पसार झाला. ही धक्कादायक घटना (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली आहे. फरार (Crime News) झालेल्या संशयित आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

चोपडा तालुकातील धनवाडी शिवारात घडलेल्या या घटनेत रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) या महिलेची हत्या झाली आहे. संशयित पती दुरसिंग बारेला यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारेला दाम्पत्य हे धनवाडी शिवारातील योगीराज पाटील यांच्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान रेखाबाई बारेला यांची पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित (jalgaon Crime) पसार झाला. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती. दरम्यान मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 
पतीने पत्नीची हत्या केलेल्या घटनेची उकल २४ तासात करीत आरोपी पाटील पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT