Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : गावचा कारभारी एसीबीच्या ताब्यात; न्यायालयाचा त्रास टाळण्यासाठी मागितली लाच, सरपंच- लिपिकासह एकजण ताब्यात

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील तक्रारदाराची कब्जे वहिवाटीत शेतजमीनवर ग्रामपंचायतीने त्यांचा हक्क दाखवून जागा परस्पर इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : शेतकऱ्याची मालकीची जमीन असताना शेतजमिनीबाबत न्यायालयाचा त्रास होऊ नये, यासाठी सरपंचाने ७० वर्षीय तक्रारदाराकडे दहा लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेल्या रक्कमेतील दोन लाखांची रक्कम दुसऱ्या एकाच्या हातून स्वीकारल्याप्रकरणी सरपंचांसह ग्रामपंचायतीचा लिपिक व सरपंचाचा हस्तक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील ७० वर्षीय वृद्ध तक्रारदाराची कब्जे वहिवाटीत शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायतीने त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात तक्रारदाराने न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने ग्रामपंचायतीविरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता. यानंतर देखील सरपंचाकडून त्रास सुरु होता. 

कोर्ट कचेरीचा त्रास सहन करण्याची दिली धमकी 

दरम्यान सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदाराला भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत न्यायालयात त्रास होऊ द्यायचा नसेल, तर शेतजमिनीतून दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट मला खरेदी करून देण्याचे सांगितले. त्यावर तक्रारदाराने प्लॉट स्वरूपात काही एक देऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदाराकडे दहा लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास कोर्ट कचेऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल, असेही सांगितले. 

मात्र तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार २९ नोव्हेंबरला पंचांसमक्ष पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी तक्रारदाराकडे दीड हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 

सापळा रचत घेतले ताब्यात 

सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी तक्रारदाराला भेटून लाचेची रक्कम बहाळ येथे तक्रारदाराच्या राहत्या घरी सुरेश ठेंगे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार, ‘एलसीबी’च्या पथकाने सापळा रचला. सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला दोन लाखांचा हप्ता पंचांसमक्ष स्वीकारताना सुरेश ठेंगे याला मुद्देमालासह पकडले. या प्रकरणी ‘एलसीबी’च्या पथकाने सरपंच राजेंद्र मोरे, लिपिक शांताराम बोरसे व सुरेश ठेंगे यांना ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT